संस्थेची सुरुवात एका छोट्याशा शटर पासून झाली असून आज संस्थेची सुसज्ज अशी स्वमालकीची इमारत आहे. संस्थेने हा प्रवास अतिशय पारदर्शक व विश्वासाने पूर्ण केला आहे. सहकारी चळवळीचा मुल हेतू म्हणजे सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकांचा आर्थिक स्तर उंचावोन त्यांना या प्रगती पथावर सामावून घेणे होय. हेच ध्येय नजरेसमोर ठेवून पंचकृशीतील सुशिक्षित बेरोजगार व आर्थिक दृष्टया दुर्बल होतकरू तरुणांना विविध लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करून सहकार ध्येय पूर्ती करिता छोटासा नम्र प्रयत्न करत आहोत. संस्थेची स्थापना सर्व सामान्य जनतेचा विकासाकरिता झाली असून संस्थेने नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून आधुनिकतेची कास धरली आहे.